सोमवार, १ ऑक्टोबर, २०१८

आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत कोहली प्रथम स्थानावर - २ ऑक्टोबर २०१८

आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत कोहली प्रथम स्थानावर - २ ऑक्टोबर २०१८

* आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजीत पहिल्या दोन्ही क्रमांकावर भारतीय खेळाडू आले आहेत. कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानावर असून आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आला आहे. 

* आशिया करंडक स्पर्धेचा मानकरी ठरलेला शिखर धवन ५ व्या स्थानावर आला आहे. गोलंदाजीत कुलदीप यादव प्रथमच तिसऱ्या स्थानावर आला आहे.

* अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अफगाणिस्थानच्या रशीद खानने बांगलादेशच्या शकिब अल हसनला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे.

* सांघिक क्रमवारीत काही फरक पडलेला नाही. इंग्लंड आघाडीवर असून, भारत दुसऱ्या स्थानावर, न्यूझीलँड तिसऱ्या स्थानावर, तर दक्षिण आफ्रिका चौथ्या स्थानावर आहे.

* आशिया करंडक स्पर्धेतून भारताला एका तर अफगाणिस्थानला पाच गुणांचा फायदा झाला. पाकिस्तान आणि श्रीलंका संघाला प्रत्येकी तीन गुण गमवावे लागले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.