रविवार, २१ ऑक्टोबर, २०१८

हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी ओल्ली कासव अधीकृत शुभंकर - २१ ऑक्टोबर २०१८

हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी ओल्ली कासव अधीकृत शुभंकर - २१ ऑक्टोबर २०१८

* पुरुष हॉकी विश्वचषक २०१८ स्पर्धेसाठी ओल्ली नावाच्या कासवाची अधिकृत शुभंकर मॅस्कॉट म्हणून निवड करण्यात आली आहे.

* ऑलिव्ह रिडले कासवाच्या संरक्षणासाठी जागरूकता पसरविणे हा या निर्णयामागचा उद्देश आहे. ही प्रजाती ओडिशा राज्यात गहिरमाथा तटावर आढळतो. आणि ती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे.

* पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या १४ व्या आवृत्तीचे आयोजन २८ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर २०१८ दरम्यान ओडिशामध्ये भुवनेश्वर येथे होणार आहे.

* या स्पर्धेत १६ देश सहभागी होतील. कलिंगा स्टेडियम, भुवनेश्वर येथे ही स्पर्धा आयोजित केली जाईल. विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणारे संघ भारत, इंग्लंड, चीन, मलेशिया, कँनडा, पाकिस्तान, बेल्जीयम, जर्मनी, न्यूझीलंड, स्पेन, आयर्लंड, फ्रांस, अर्जेंटिना, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, आणि दक्षिण आफ्रिका. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.