बुधवार, ३ ऑक्टोबर, २०१८

नोबेल पुरस्कार २०१८ - ३ ऑक्टोबर २०१८

नोबेल पुरस्कार २०१८ - ३ ऑक्टोबर २०१८

* नकारात्मक  प्रतिकार नियमनाच्या प्रतिबंधातून कर्करोगावर उपचार शोधल्याबद्दल या दोघांचा नोबेलने सन्मान करण्यात आल्याचे नोबेल अकादमीने पुरस्काराची घोषणा करताना सांगितले. 

* शरीराच्या नैसर्गिक प्रतिकार क्षमतेला कर्करोगाच्या पेशींना मारण्यापासून रोखणारे प्रथिन हटवणारी उपचार पद्धती या दोघांनी शोधून काढली. यामुळे कर्करोगावर वेगाने नियंत्रण मिळवणे शक्य होते. 

* जेम्स ऍलिसन हे अमेरिकेतील टेक्सस विद्यापीठात प्राधापक आहेत. तर तासुकु होन्जो हे जपानमधील क्योटो विद्यापीठात प्राध्यापक आहेत. 

* नोबेल पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवण्यासाठी कर्करोगावरील उपचार पद्धतीवरील संशोधन पुढे सुरूच ठेवणार असल्याची प्रतिक्रिया तासुकु होन्जो यांनी दिली आहे. 

* अत्यंत गंभीर आजारातून माझ्या उपचार पद्धतीमुळे जिवंत बचावल्याने लोक जेव्हा सांगतात. तेव्हा मला अत्यानंद होतो असे ते म्हणाले. 

* २०१४ मध्ये या दोघांना या संशोधनासाठी आशियातील नोबेल म्हणून गणल्या जाणाऱ्या टँग पुरस्काराने गौरविण्यात आले होते. 

* पुरस्कार स्वरूपात दोघांना नोबेल पदक प्रशस्तिपत्रक आणि १० लाख डॉलर्स म्हणजेच जवळपास सव्वासात कोटींची रक्कम विभागून मिळेल. येत्या १० डिसेंबर रोजी स्टोकहोम येथे होणाऱ्या औपचारिक कार्यक्रमात या दोघांचा नोबेल पुरस्काराने गौरव केला जाईल.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.