बुधवार, १७ ऑक्टोबर, २०१८

काही नवीन चालू घडामोडी - २० ऑक्टोबर २०१८

काही नवीन चालू घडामोडी - २० ऑक्टोबर २०१८

* जागतिक आर्थिक मंचने [डब्लूईफ] भारतात मुंबई येथे चौथ्या औद्योगिक क्रांती ४.० सुरु केले असून नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे केंद्र सुरु केले आहे.

* भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने इस्रो केंद्रीय जम्मू विद्यापीठाबरोबर अंतराळ विज्ञान केंद्र स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार  केला आहे.

* गंगा नदी प्रदूषणमुक्त  करण्यासाठी कार्य करणारे प्राध्यापक जी. डी. अग्रवाल यांचे ११ ऑक्टोबर रोजी निधन झाले.

* मलेशियन सरकारने मृत्युदंडाची शिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मलेशियामध्ये खून, मादक, पदार्थाची तस्करी, देशद्रोह, दहशतवाद या गुन्ह्यासाठी मृत्यूदंडाची शिक्षेची तरतूद आहे.

* १२ ऑक्टोबर २०१८ रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने रौप्य जयंती साजरी केली. १२ ऑक्टोबर १९९३ रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली होती.

* जागतिक बँकेने जाहीर केलेल्या मनुष्यबळ निर्देशांक यादीमध्ये भारताला ११५ वे स्थान प्राप्त झाले आहे. १५७ देशांच्या या यादीमध्ये सिंगापूर प्रथम क्रमांकावर आहे.

* पंजाबमधील अमृतसर शहराजवळ रावणदहन पाहण्यासाठी जमलेल्या एका रेल्वेच्या रुळावर जमा झालेल्या लोकांवर भरधाव ट्रेनने चिरडून ६१ हुन अधिक लोक ठार तर ७२ जण जखमी झाले.

* प्रियंका कानूनगो यांची राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ ३ वर्षाचा असेल.

* उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जिल्ह्यांचे नामांतर प्रयागराज असे करण्यासाठी उत्तरप्रदेश मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

* अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयरिस येथे आयोजित युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने रौप्यपदक जिंकले.

* संगीतकार लेखक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी यांना २०१८ चा हृद्यनाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला.

* जकार्ता इंडोनेशिया मध्ये आयोजित आशियाई पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा २०१८ ला समारोप झाला. ६ ते १३ ऑक्टोबर या दरम्यान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात भारताने १५ सुवर्ण, २४ रौप्य, ३३ कास्य अशी एकूण ७२ पदके जिंकली आहेत. तर चीनने सर्वाधिक १७२ सुवर्ण, ८८ रौप्य, ५९ कास्य पदके जिंकत ३१९ एकूण पदके जिंकली.

* भारताचे माजी राष्ट्रपती आणि विख्यात अंतराळ शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस भारतासह सर्व जगात जागतिक विद्यार्थी दिन म्हणून पाळला जातो.

* दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिल्ली सरकारच्या वतीने मुख्यमंत्री शहरी लीडर्स फेलोशिप कार्यक्रमाचा शुभारंभ केला.

* जगातील सर्वात मोठ्या हस्तकला प्रदर्शन आयएचजीएफ दिल्ली मेळाव्याच्या ४६ व्या आवृत्तीचे आयोजन १४ ते १८ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले.

* अफगाणिस्तानच्या हजरतुल्लाह जजईने अफगाणिस्तान प्रीमियर लीगमध्ये काबुल जवानन संघाचे प्रतिनिधित्व करताना एका षटकात ६ षटकार मारण्याचा पराक्रम केला.

* भारतीय नौदलामध्ये प्रथमच बचावकार्यात वापरण्यात येणारे डीएसआरव्ही वाहन समाविष्ट करण्यात आले. यामुळे भारतीय नौदलाच्या पाणबुडी बचाव क्षमतेमध्ये वाढ झाली असून हे आधुनिक वेसल असणाऱ्या निवडक देशांच्या पंक्तीत भारताला स्थान मिळाले आहे.

* केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निवड समितीने डॉ शेखर मांडे यांना  वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेच्या सीएसआयआर महासंचालकपदी नियुक्त केले.

* स्टॅनफोर्ड विद्यापीठाला रॉयटर्स न्यूज एजन्सीच्या क्रमवारीमध्ये जगातील सर्वात अभिनव इनोव्हेटिव्ह विद्यापीठाचा किताब मिळाला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.