सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१८

ममता कालिया यांना व्यास सम्मान पुरस्कार जाहीर - २१ ऑक्टोबर २०१८

ममता कालिया यांना व्यास सम्मान पुरस्कार जाहीर - २१ ऑक्टोबर २०१८

* आधुनिक हिंदी साहित्यातील प्रख्यात कथालेखिका ममता कालिया यांना त्यांच्या दुःखम सुखम या कादंबरीसाठी प्रतिष्ठेचा व्यास सम्मान जाहीर झाला आहे.

* ममता कालिया यांचा जन्म २ नोव्हेंबर १९४० रोजी मथुरा येथे झाला. त्यांचे वडील विद्याभूषण अग्रवाल हे हिंदी साहित्यातील एक विद्वान मानले जाते.

* दिल्ली विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात ममताजीनी एम ए केले नंतर मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठात त्यांनी अध्यापनाचे कार्य सुरु केले.

* सुरवातीला काही नियतकालिकांमधून त्यांनी इंग्रजीतुन लिखाण केले. नंतर मात्र हिंदी लेखनावरच त्यांनी भर दिला.

* बेघर, मेला, मुखवटा, बोलणे वाली औरत, रोशनी की मार, प्रेम कहाणी, दौडक, दुखम्म दुखम्म या त्यांच्या कादंबऱ्या वाचकप्रिय ठरल्या.

* यापूर्वी त्यांना उत्तर प्रदेश हिंदी साहित्य संस्थेचा यशपाल कथा सम्मान तसेच साहित्य पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार हिंदी साहित्यामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भारतीय व्यक्तीला व्यास सन्मान दरवर्षी प्रदान करण्यात येतो.

* के के बिर्ला फाउंडेशन १९९१ मध्ये या पुरस्काराची सुरुवात केली. सन्मान चिन्ह व ३.५० लाख रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.