रविवार, २१ ऑक्टोबर, २०१८

राज्याचे समग्र शिक्षा अभियानातील निष्कर्ष - २० ऑक्टोबर २०१८

राज्याचे समग्र शिक्षा अभियानातील निष्कर्ष - २० ऑक्टोबर २०१८

* सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षांपासून राज्यात समग्र शिक्षा अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. यात अंगणवाडी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार समग्र शिक्षाचा लाभ.

* प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाच्या ३ वर्षाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे भारत सरकारच्या शैक्षणिक विकास निर्देशांकात अहवालात राज्य भौतिक सुविधांत क्रमांक ४ वरून १ वर आणि निष्पत्तीमध्ये क्रमांक १४ वरून ८ वर.

* सन २०१६ च्या अहवालानुसार इ तिसरी च्या सरासरी संपादणूक मध्ये देशात तिसऱ्या क्रमांकावर. इ आठवी भाषा सरासरी संपादणूक मध्ये राज्य देशात ६३% प्रथम क्रमांकावर.

* अध्यापन पद्धतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. राज्यात शासकीय शाळांमधील डिजिटल युगामुळे ६६,४५८ शाळा झाल्या डिजिटल.

* शिक्षकांच्या मदतीसाठी मित्राची ऍप सुविधा. सर्व शासकीय शाळांमध्ये इंग्रजीच्या समृद्धीमध्ये तेजस कार्यक्रमाची सुरुवात.

* राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ओजस व तेजस शाळा स्थापन करण्याचे नियोजन. शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी बालरक्षक चळवळीची राज्यात जोमाने सुरुवात.

* २६ हजार बालरक्षक शिक्षकाकडून मागील एका वर्षात ७ हजार पेक्षा जास्त मुलांचे स्थलांतरण रोखण्यात यश. राष्ट्रीय व राज्यस्तरीय संपादणूक चाचणीनुसार शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख वाढता.

* शैक्षणिक गुणवत्ता उत्कृष्ट असणाऱ्या मराठी शाळांमध्ये इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना पुनर्प्रवेश. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.