शुक्रवार, १९ ऑक्टोबर, २०१८

चीन सोडणार अंतराळात कुत्रिम चंद्र - १८ ऑक्टोबर २०१८

चीन सोडणार अंतराळात कुत्रिम चंद्र - १८ ऑक्टोबर २०१८

* विजेची बचत करण्यासाठी जगात वेगवेगळे प्रयोग सुरु असतात. चीनने मात्र मानवनिर्मित चंद्रामार्फत विजेचा प्रश्न सोडविण्याचे ठरवले आहे. एका शहरात रस्त्यावरील दिव्यांच्या जागी आकाशात सोडण्यात येणारा चंद्रच उजेड देणार आहे.

* पीपल्स डेली या चीनमधील प्रमुख वृत्तपत्राने हे वृत्त प्रकाशित केले आहे. चीनने असे तीन चंद्र तयार करण्याचे ठरविले आहे. ते तिन्ही चंद्र आपल्या नैसर्गिक चंद्रापेक्षा आठपट अधिक उजेड देणारे असतील.

* चेंगडू या शहरात रस्त्यावरील दिव्यांनी मिळणारा प्रकाश या चंद्राद्वारे मिळेल. असे सिऊचान प्रांतातील एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशनचे वू चुनफेंग यांनी ही माहिती दिली आहे.

* अवकाश संशोधन करणारी ही संस्था आहे. मानवनिर्मिती तीन चंद्रामुळे चेंगडूमधील १० ते ८० किलोमीटरच्या परिसरात लख्ख प्रकाश पडू शकेल. रस्त्यावरील दिव्यासाठी लागणारी वीज आणि खर्च यात बचत करणे हा या प्रयोगामागील हेतू आहे. 

* या चंद्रामुळे दरवर्षी २४ कोटी रुपयाची बचत होईल. पण या चंद्रासाठी किती खर्च येईल. हे स्पष्ट करण्यात आले नाही. येत्या २ वर्षात हे चंद्र अवकाशात सोडण्यात येणार आहेत.

* हे चंद्र म्हणजे प्रत्यक्षात उपग्रहच असतील. त्या उपग्रहावर आरशाप्रमाणेच परावर्तित होणाऱ्या वस्तूपासून एक आवरण असेल. त्यामुळे उपग्रहाच्या पृष्ठभागावरील उजेड वा प्रकाश पृथ्वीपर्यंत येईल.

* ते उपग्रह वा चंद्र पृथ्वीपासून म्हणजे प्रत्यक्षात चेंगडू शहरापासून ५०० किलोमीटर अंतरावर स्थिरावतील. त्यामुळे त्यांचा उजेड ठराविक भागातच पोहचेल. हा प्रयोग यशस्वी झाला तर ही मोठी क्रांती ठरेल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.