बुधवार, १७ ऑक्टोबर, २०१८

भारत एफडीआय गुंतवणुकीत जगात १० व्या क्रमांकावर - १६ ऑक्टोबर २०१८

भारत एफडीआय गुंतवणुकीत जगात १० व्या क्रमांकावर - १६ ऑक्टोबर २०१८

* भारताने चालू वर्षातील पहिल्या सहामाहीत २२ अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक एफडीआय आकर्षित केल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या यूएन एका अहवालातून समोर आली आहे.

* परकी गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या टॉप १० देशांच्या यादीत भारताने यंदाही आपले स्थान कायम राखले आहे. यूएनच्या व्यापार व विकास परिषदेने सोमवारी इन्व्हेस्टमेंट ट्रेड मॉनिटर हा अहवाल प्रसिद्ध केला.

* भारताने आकर्षित केलेल्या २२ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीमुळे दक्षिण रशियातील एकूण एफडीआयमध्ये १३% वृद्धी झाली आहे.

* तिथेच जागतिक पातळीवर मात्र यात ४१ टक्क्यांनी घट झाली असून. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची करविषयक धोरणे यास कारणीभूत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

* यावर्षी अनुक्रमे एफडीआय गुंतवणूक चीन ७०, ब्रिटन ६५.५, अमेरिका ४६.५, नेदरलँड ४४.८, ऑस्ट्रेलिया ३६.१, सिंगापूर ३४.७, ब्राझील २५.५. भारत २२ अब्ज. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.