रविवार, ७ ऑक्टोबर, २०१८

काही नवीन चालू घडामोडी - ७ ऑक्टोबर २०१८

काही नवीन चालू घडामोडी - ७ ऑक्टोबर २०१८

* केंद्रीय रेल्वे मंत्रालयाला स्वच्छता पंधरवड्याच्या स्वच्छता ही सेवा या श्रेणीमधील योगदानासाठी पुरस्कृत करण्यात आले.

* भर सरकारद्वारे सुरु करण्यात आलेला हा राष्ट्रीय पातळीवरील उपक्रम आहे. या अभियानाचे घोषवाक्य एक कदम स्वच्छता की ओर हे आहे.

* केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय मानसिक पुनर्वसन संस्था मध्यप्रदेशातील सिहोर जिल्ह्यात उभारण्यास मान्यता दिली आहे. यापूर्वी ही संस्था भोपाळ येथे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

* स्पेनमधील भारताचे नवीन राजदूत म्हणून संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

* दक्षिण कोरियाच्या सेऊलस्थित न्यायालयाचे देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष ली म्यून्ग बाक यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात १५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

* बिहारमधील पटना विद्यापीठातील गंगा नदीच्या किनाऱ्यावर राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे.

* संयुक्त राष्ट्र निशास्त्रीकरण परिषदेसाठी भारताचे स्थायी प्रतिनिधी म्ह्णून पंकज शर्मा यांना नियुक्त करण्यात आले आहे. ते अमरदीप गिल यांची जागा घेतील.

* संयुक्त गुप्तचर समितीचे अध्यक्ष आर एन रवी यांची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एनएसए म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

* जगातील सर्वात मोठ्या व्यासाच्या घुमटाचे उदघाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते लोणी काळभोर पुणे येथे करण्यात आले.

* केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने कॉम्प्रेस्ड जैव इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देणाऱ्या [सतत] या उपक्रमाची सुरुवात केली आहे. सततचे पूर्ण रूप Sustainable Alternative Towards Affordable Transportation असे आहे.

* रि-इन्व्हेस्ट २०१८ या दुसऱ्या जागतिक नूतनीकरणक्षम ऊर्जा गुंतवणूक सभा आणि प्रदर्शनाचे आयोजन नोएडामध्ये करण्यात आले होते.

* भारताच्या वरिष्ठ संघापाठोपाठ भारताच्या युवा क्रिकेट संघाने पी सिमरन नेतृत्वाखाली आशिया १९ वर्षाखालील चषक जिंकला.

* भारत कौशल्य स्पर्धा २०१८ चा समारोप ६ ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे झाला. ही भारतातील सर्वात मोठी कौशल्य स्पर्धा आहे.

* भारताने ४ अणुभट्ट्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या [IAEA] देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अणुऊर्जा विभागाचे अध्यक्ष शेखर बसू यांनी १९ सप्टेंबर रोजी घोषणा केली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.