गुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१८

युथ ऑलिम्पिक स्पर्धेत सौरभ चौधरींचे सुवर्णयश - ११ ऑक्टोबर २०१८

युथ ऑलिम्पिक स्पर्धेत सौरभ चौधरींचे सुवर्णयश - ११ ऑक्टोबर २०१८

* सौरभ चौधरीने युथ ऑलिम्पिकमध्ये बुधवारी १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. भारतीय ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंतची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली.

* १६ वर्षाच्या सौरभने २४४ गुणांची कमाई केली. त्याने द कोरियाचा सुंग युनहो २३६ आणि स्वित्झर्लंडचा सोलारी २१५ यांना मागे टाकले.

* आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीत सौरभने दहापेक्षा अधिक गुणांची १८ वेळा नोंद केली. आशियाई क्रीडा स्पर्धा आणि ज्युनिअर आयएसएसएफ विश्वचॅम्पियन शिपमध्ये सुवर्ण विजेत्या राहिलेल्या त्याने अंतिम फेरीत अव्वल स्थान पटकावले होते.

* चार दिवसात चौथ्यांदा भारताच्या नेमबाजांनी पदक जिंकले आहे. शानू माने आणि मेहली घोष यांना रौप्य पदक मिळाले होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.