गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१८

विक्रम लिमये डब्ल्यूईएफच्या कार्यकारी अध्यक्षपदी - ४ ऑक्टोबर २०१८

विक्रम लिमये डब्ल्यूईएफच्या कार्यकारी अध्यक्षपदी - ४ ऑक्टोबर २०१८

* भारतातील अग्रणी भांडवली बाजार अर्थात राष्ट्रीय शेअर बाजाराचे एनएसई लिमिटेड व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी विक्रम लिमये यांची जागतिक भांडवली बाजारांचा महासंघ असलेल्या वर्ल्ड फेडरेशन ऑफ एक्सेंजेस डब्ल्यूईएफ च्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष आणि महासंघाच्या संचालक मंडळावर निवड घोषित करण्यात आली आहे.

* अथेन्स, ग्रीस येथील महासंघाच्या ५८ व्या आमसभा आणि वर्षीक बैठकीत ही निवड बुधवारी जाहीर करण्यात आली.

* जगभरातील ४५,००० सूचिबद्ध कंपन्या आणि त्यातील समभागांचे व्यवहार हाताळणाऱ्या भांडवली बाजार आणि क्लियरिंग हाऊस यांचा डब्ल्यूईएफ हा एक महासंघ आहे.

* २०० हुन अधिक बाजार मंच महासंघाचे सभासद आहेत. लिमये यांनी या निवडीबाबत प्रतिक्रिया आणि देताना, पारदर्शी, स्थिर आणि कार्यषम भांडवली बाजाराच्या विकासासाठी प्रयत्नरत आणि जगभरातील धोरणकर्ते, नियामक आणि सरकारी संस्थांसह कार्य करणाऱ्या एका जागतिक संस्थेवर नेतृत्वापायी भूमिका बजावण्याची संधी हा मोठा बहुमान असल्याचे सांगितले.

* डब्ल्यूईएफ चे मुख्यालय हे लंडनमध्ये असून या महासंघाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी सुकुमार यांनी लिमये यांच्या निवडीने स्वागत प्रसिद्धीपत्रकाने केले आहे.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.