सोमवार, १ ऑक्टोबर, २०१८

चीनकडून तीन हायपरसॉनिक अणवस्त्रवाहू विमानांची चाचणी - १ ऑक्टोबर २०१८

चीनकडून तीन हायपरसॉनिक अणवस्त्रवाहू विमानांची चाचणी - १ ऑक्टोबर २०१८

* चीनने पहिल्यांदाच तीन प्रकारच्या हायपरसॉनिक लढाऊ विमानांच्या मॉडेलची एकाच वेळी यशस्वी चाचणी घेतली आहे. हवाई हल्ल्यानुसार गती बदलण्याची क्षमता या लढाऊ विमानामध्ये आहे.

* इतकेच नाही तर अणवस्त्र वाहून नेण्यासाठी देखील हे विमान सक्षम आहे. या चाचणीमुळे चीनची हवाई ताकद आणखी वाढणार असल्याचे मानले जात आहे.

* उत्तर पश्चिम चीनच्या जीयूक्वान उपग्रह प्रक्षेपण केंद्रावर या विमानाची चाचणी घेण्यात आली. तिन्ही लढाऊ विमानाचे डिझाईन वेगवेगळे आहेत.

* त्यांना डी १८-१ एस, डी १८-२ एस, आणि डी १८ - ३ एस असे कोड देण्यात आले. तिन्ही हायपरसोनिक विमानांची गती ही हल्ल्यानुसार नियंत्रित केली जाऊ शकते.

* चीनने गती नियंत्रित करता येणाऱ्या हायपरसॉनिक विमानांची पहिल्यांदाच चाचणी घेतली आहे. या विमानाचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा सहा पट अधिक आहे.

* अर्थात ताशी ७००० किलोमीटर वेगाने हे विमान शत्रूवर हल्ला करू शकते. उल्लेखनीय म्हणजे संरक्षण क्षेत्रामध्ये अमेरिका, रशिया आणि युरोपियन संघाला मात देण्यासाठी चीनकडून संरक्षणावर भरभक्कम खर्च केला जातो.

* याअंतर्गत चीनकडून २०१४ पासून हायपरसॉनिक ग्लाइड वाहनांची चाचणी घेतली जात आहे. तर अमेरिका आणि रशियादेखील अशा प्रकारच्या हायपरसॉनिक ग्लाइड विमानाची चाचणी घेतली जात आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.