रविवार, ७ ऑक्टोबर, २०१८

देशातील ५ राज्यांच्या निवडणूका जाहीर - ७ ऑक्टोबर २०१८

देशातील ५ राज्यांच्या निवडणूका जाहीर - ७ ऑक्टोबर २०१८

* उत्तरेकडील छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थान ईशान्येकडील मिझोराम व दक्षिण भारतातील तेलंगणा या पाच राज्यामध्ये नोव्हेंबर व डिसेंबरात विधानसभा निवडणूका होणार आहेत. 

* पुढील वर्षी लोकसभा निवडणुकांची ही नांदीच असेल. या मिनी सार्वत्रिक निवडणूका असून जनता पुन्हा भाजपाला मते देते की काँग्रेसला कौल देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 

* यापैकी छत्तीसगढ, राजस्थान व मध्यप्रदेश येथे भाजपची सरकारे आहेत. तिथे काँग्रेसची स्थिती सुधारल्याने ओपिनियन पोलमधून दिसत आहे. 

* भाजप व काँग्रेस या महत्वाच्या पक्षांनी या तिन्ही राज्यात सारी ताकद लावली आहे. भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा हे तिथे स्टार प्रचारक आहेत. 

* काँग्रेसतर्फे राहुल गांधी यांनी सर्व ठिकाणी प्रचाराची धुरा उचलली आहे. मध्य प्रदेशची जबाबदारी कमलनाथ व ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर आहे. 

* तेलंगणात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी विधानसभा बरखास्तीचा निर्णय घेतल्याने मुदतपूर्व निवडणूका होत असून तिथे तेलंगण राष्ट्रीय समिती, भाजपा व काँग्रेस व तेलगू देसम यांची आघाडी अशी तिरंगी लढत होईल. 

* पाच राज्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर राज्यात निवडणुका होणार असून मतमोजणी ११ डिसेंबर रोजी होणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.