सोमवार, १ ऑक्टोबर, २०१८

रजनीकांत मिश्रा बीएसएफचे नवे महासंचालक - १ ऑक्टोबर २०१८

रजनीकांत मिश्रा बीएसएफचे नवे महासंचालक - १ ऑक्टोबर २०१८

* प्राणाची बाजी लावून देशाच्या सीमेचे संरक्षण करणारे सीमा सुरक्षा दल [बीएसएफ], आणि सशस्त्र सीमा बल एसएसबी रविवारी नवे महासंचालक मिळाले आहेत.

* १९८४ च्या उत्तर प्रदेश तुकडीचे आयएएस अधिकारी रजनीकांत मिश्रा यांच्याकडे बीएसएफची धुरा सोपविण्यात आली आहे. 

* तर एसएसबीच्या प्रमुखपदी एसएस देसवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीएसएफचे निवृत्त महासंचालक के के शर्मा यांच्याकडून मिश्रा यांनी पदभार स्वीकारला आहे.

* पुढील वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत मिश्रा हे सेवा देणार आहेत. तर एसएसबीचे देसवाल हे आयपीएस सेवेतील हरियाणा कॅडरचे अधीकारी आहेत. ते ऑगस्ट २०२१ पर्यंत महासंचालक म्हणून पदावर राहणार आहेत.

* बीएएसएफकडे तब्बल २.५ लाख जवानांचा फौजफाटा आहे. पाकिस्तानलगतची ३००० किमी आणि बांग्लादेशलगतची ४०९६ किमी लांबीच्या सीमेचे संरक्षण करण्याची जाबाबदारी BSF च्या खांदयावर आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.