मंगळवार, ११ सप्टेंबर, २०१८

राज्याची फळबाग लागवड कार्यक्रम - १० सप्टेंबर २०१८

राज्याची फळबाग लागवड कार्यक्रम - १० सप्टेंबर २०१८

* रोजगार हमी योजनेशी संबंधित फळबाग लागवड कार्यक्रम जिल्हास्तरावर राबविण्यात येतो. फळ पिकांचा क्षेत्र विस्तार व उत्पादन वाढ असा या योजनेचा मुख्य हेतू आहे.

* कोरडवाहू फळ पिके - आंबा, काजूबोर, सीताफळ, चिंच, आवळा, फणस, कोकम, जांभूळ, कवठ, बागायती फळ पिके - नारळ, संत्रा, मोसंबी आदी पिकांच्या लागवड आणि संवर्धनासाठी अनुदान उपलब्द करून देणे.

* यात सर्व प्रवर्गातील शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. शेतकऱ्याकडे स्वतःचे शेती क्षेत्र व पाण्याची उपलब्द्तात असावी.

* सातबारा, ८ अ चा उतारा जोडून अर्ज करणे आवश्यक आहे. योजनेअंतर्गत लागवड केलेल्या फळ पिकासाठी तीन वर्षापर्यंत अनुदान वाटप केले जातात.

* एकूण अनुदानाच्या पहिल्या वर्षी ५०%, दुसऱ्या वर्षी ३०%, आणि तिसऱ्या वर्षी ९०% झाडे जिवंत असतील. त्या लाभार्त्याना दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाचे अनुदान देण्यात येते. शेतकऱ्यांनी संबंधित मंडळ कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.