शुक्रवार, २१ सप्टेंबर, २०१८

जगातील ३० कोटी बालके शिक्षणापासून वंचित - २१ सप्टेंबर २०१८

जगातील ३० कोटी बालके शिक्षणापासून वंचित - २१ सप्टेंबर २०१८

* जगातील शैक्षणिक परिस्थितीचे वास्तव युनिसेफच्या अहवालातून सामोर आले आहे. जगातील प्रत्येक पाचपैकी एक बालक शालेय शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे वास्तव या अहवालातून समोर आले आहे. शिक्षणावरील गुंतवणूक वाढवण्याची गरजही या अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे.

* युनिसेफच्या अ फ्युचर स्टोलन यंग अँड आउट ऑफ स्कुल या अहवालानुसार जगातील पाच वर्षे ते १७ वर्षे वयोगातील ३०.३ कोटी बालके शालेय शिक्षणापासून वंचित आहेत.

* यापैकी एक तृतीयांश म्हणजेच जवळपास १० कोटी मुले ही संघर्षग्रस्त देशातील असल्याचेही यात म्हटले आहे. संघर्षग्रस्त भागात राहणारे १५ वर्षे ते १७ वर्षे वयोगटातील पाचपैकी एक बालक कधीही शाळेत गेलेले नाही.

* जेव्हा एखाद्या देशात संघर्ष होतो तेव्हा त्या देशातील बालके व तरुण पिढीला याचा दुहेरी फटका बसतो. संघर्षामुळे त्यांच्या शाळा नष्ट होतात व ते कोट्यवधी शाळाबाह्य बालकामध्ये समाविष्ट होतात.

* यामुळे त्यांचे भवितव्य अंधकारमय होऊन जाते. असे युनिसेफच्या कार्यकारी संचालिका हेन्नीएटा फोरे म्हणाल्या या बालकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी युद्ध टाळून शिक्षणावरील गुंतवणूक वाढवण्याची गरज अहवालात अधोरेखित करण्यात आली आहे.

* भविष्यातील मनुष्यबळात दर्जेदार शिक्षण व नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्द करून दिल्यास जगाची अर्थव्यवस्था आणखीन मजबूत होईल. असे यात आहे.

* सध्या युनिसेफच्या जागतिक मानवीय निधीपैकी ४% रक्कम शिक्षणावर खर्च केली जाते. येत्या २०३० पर्यंत जगातील १० वर्षे ते १९ वर्षे वयोगातील बालकांची संख्या १३० कोटीवर पोहोचण्याचा अंदाज यात वर्तविण्यात आला आहे.

* जागतिक समृद्धीसाठी आपआपल्या आताच प्रयत्न करून शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज युनिसेफ प्रमुखांनी व्यक्त केली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.