शनिवार, ८ सप्टेंबर, २०१८

जगात सर्वात उत्साही देशात भारत ११७ व्या क्रमांकावर - ८ सप्टेंबर २०१८

जगात सर्वात उत्साही देशात भारत ११७ व्या क्रमांकावर - ८ सप्टेंबर २०१८

* ज्या देशातील नागरिकांमध्ये अचाट उत्साह असतो, अशा देशांचा विकास झाल्याशिवाय राहत नाहीत हे चीन जपानसारख्या देशावरून दिसून येते.

* अशाच देशाबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे WHO एक पाहणी केली असून, त्यात युगांडा सर्वात उत्साही, तर कुवेत सर्वात आळशी देश असल्याचे समोर आले आहे.

* या अहवालात १५६ देशात पाहणी करण्यात आली. याचा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला. दररोज ७५ मिनिटे किंवा आठवड्यातून १५० मिनिटे व्यायाम करणारी व्यक्ती सक्रिय हा निकष WHO ने वापरला.

* जगात प्रत्येक चार व्यक्तीमागे एक व्यक्ती नियमित व्यायाम करीत नसल्याचे आढळून आले. यात कुवेत ६७ टक्के, इराक ब्राझीलमध्ये आळशी लोकांचे प्रमाण मोठे असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

* भारत या यादीत ११७ व्या स्थानी असून, अमेरिका १४३, ब्रिटन १२३, सिंगापूर १२६ ऑस्ट्रेलिया ९७ या देशातील नागरिक अधिक आळशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तान भारताच्या खूप मागे आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.