बुधवार, १९ सप्टेंबर, २०१८

जर्मनीत धावली जगातील पहिली हायड्रोजन ट्रेन - १९ सप्टेंबर २०१८

जर्मनीत धावली जगातील पहिली हायड्रोजन ट्रेन - १९ सप्टेंबर २०१८

* इंधनाचा तुटवडा आणि विजेच्या वाढत्या मागणीवर जर्मनीने आता मात केली असून, पर्यायी इंधनाच्या आधारे तिथे पहिली ट्रेन धावली आहे. 

* हायड्रोजनवर धावणारी ही ट्रेन पूर्णपणे प्रदूषणविरहित असून, येत्या तीन वर्षात अशा १४ गाड्या जर्मनीत धावू लागणार आहेत. 

* हायड्रोजनद्वारे कार, बाईक, चालविण्यात येत असल्याच्या बातम्या येत असतात.  पण हायड्रोजनवर चालणारी जगातील पहिली ट्रेन सोमवारी जर्मनीत धावली आहे.  

* डिझेलच्या इंजिनावर धावणाऱ्या ट्रेनमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. आणि विजेवर ट्रेन धावण्यासाठी खूपच वीज लागते. तेवढी वीज होण्याची अनेकदा शक्यता नसते. 

* त्यामुळे जगभरात हायड्रोजनवर वाहने चालविण्याच्या दृष्टीने संशोधन सुरु असताना, जर्मनीने ते करून दाखविले. जर्मनीतील कक्सहेवन ते बुस्टहेड्स या १०० किमीचे अंतर या हायड्रोजन ट्रेनने पूर्ण केले. 

* तिथे नेहमी डिझेलच्या इंजिनचा वापर होत असल्याने धूर व प्रदूषणाचा त्रास होता. पण या नव्या ट्रेनमुळे शून्य वायूउत्सर्जन झाले. असा दावा येथील अधिकाऱ्याने सांगितले. 

* हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे २०२१ पर्यंत हायड्रोनवर चालणाऱ्या आणखी १४ गाड्या रेल्वेला मिळणार आहेत. या हायड्रोजन ट्रेनमध्ये इंधन सेल असून, त्यात हायड्रोजन व ऑस्किजनच्या वापरातून वीज तयार केली जाते. 

* वाफ व पाण्यापासून ही वीज बनते. अतिरिक्त वीज बॅटऱ्यांमध्ये साठविण्यात येते. एकदा हायड्रोजन भरला की ही ट्रेन तब्बल १००० किमी अंतर पूर्ण करू शकते. यात शून्य टक्के प्रदूषण होणार.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.