रविवार, १६ सप्टेंबर, २०१८

सिलेसियन बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोमला सुवर्णपदक - १५ सप्टेंबर २०१८

सिलेसियन बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोमला सुवर्णपदक - १५ सप्टेंबर २०१८ 

* अनुभवी मेरी कोमने ४८ किलो पोलंडमधील गिलावाईसमध्ये १३ व्या सिलेसियन बॉक्सिंगस्पर्धेत वर्षातील आपले तिसरे सुवर्णपदक पटकावले. तर मनीषा ५४ किलो रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 

* दुखापतीमुळे आशियाई गेम्सला मुकल्यावर पुनरागमन करणारी पाचवेळची विश्वचॅम्पियन एम. सी मेरी कोमने एकतर्फी लढतीत कझाकिस्तानच्या एगेरीम कसानायेव्हाचा ५-० ने पराभव करीत सुवर्णपदक मिळवून दिले. 

* मेरी कोमने यंदा दिल्लीमध्ये इंडिया ओपन आणि गोल्ड कोस्टमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. ऑलिम्पिकची माजी कांस्यपदक विजेती ३५ वर्षीय मेरी कोमने तिच्या उंचनीच्या प्रतिस्पर्धी खेळाडू विरुद्ध आक्रमक खेळ केला.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.