मंगळवार, १८ सप्टेंबर, २०१८

भारतात दर सेकंदात एका बालकाचा मृत्यू - १९ सप्टेंबर २०१८

भारतात दर सेकंदात एका बालकाचा मृत्यू - १९ सप्टेंबर २०१८

* भारतामध्ये २०१७ साली ८ लाख २ हजार बालकांचा मृत्यू ओढविला आहे. हे प्रमाण पाच वर्षाच्या तुलनेत कमी आहे. असे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे.

* २०१७ साली ६ लाख ५० हजार नवजात बालके व ५ ते १४ वर्षे वयोगटातील १ लाख ५२ हजार बालके मरण पावली. युनिसेफ इंडियाचे प्रतिनिधी यास्मिन अली हक म्हणाल्या की बालकांच्या मृत्यूचे प्रमाण घटत असून ही चांगली बाब आहे.

* नवजात बालकांच्या आरोग्य सुविधांचे प्रमाण वाढत आहे. २०१६ रोजी ८ लाख ६७ हजार बालके मरण पावली होती. मात्र हे प्रमाण त्याच्या पुढच्या वर्षी कमी झाले. सण २०१६ साली बालमृत्यूचे प्रमाण दर हजार बालकांमागे ४४ इतके होते.

* याउलट २०१७ मध्ये लहान मुलींच्या मृत्यूचे प्रमाण दर हजारामागे ३९ इतके होते. लहान मुलीच्या मृत्युदरात घट झाली.

* २०१७ साली भारतामध्ये १५ वर्षे वयाखालील ६३ लाख मुले दर पाच सेकंदाला १ यानुसार मरण पावली. त्यांना वेळीच योग्य उपचार मिळाले असते, तर ती वाचू शकली असती. असे युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना, संयुक्त राष्ट्रे लोकसंख्या विभाग, जागतिक बँक यांनी या अहवालात सादर केले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.