गुरुवार, २७ सप्टेंबर, २०१८

भारताची अर्थव्यवस्था दणकट विकास मार्गावर एडीबीचा अहवाल - २७ सप्टेंबर २०१८

भारताची अर्थव्यवस्था दणकट विकास मार्गावर एडीबीचा अहवाल - २७ सप्टेंबर २०१८

* भारताची अर्थव्यवस्था दणकट विकासाच्या मार्गावर आहे. असे एशियन डेव्हलोपमेंट बँकेने एडीबी बुधवारी सांगून चालू आर्थिक वर्षात वाढीचा दर ७.३ टक्के असेल. असे भाकीतही केले आहे.

* तथापि रुपयाच्या विनिमय दरात होत असलेली घट आणि अस्थिर बनलेल्या बाह्य आर्थिक बाजारपेठेने आव्हाने निर्माण केली आहेत. असे निरीक्षण बँकेच्या वार्षिक आसियान डेव्हलोपमेंट आऊटलूक एडीओ २०१८ अहवालात केले गेले आहे.

* बहुतेक भागात देशांतर्गत असलेली जोरदार मागणी तेल व वायूच्या किमतीला असलेली तेजी आणि भारताचा विकास स्थिर राहिल्याने भारताचा विकास स्थिर राहिलेला आहे.

* परंतु व्यापारातील वाढत्या तणावामुळे त्या भागाच्या लवचिकतेची परीक्षाच होणार आहे. असे यात अहवालात म्हटले आहे.  देशादेशामध्ये व्यापारी करार करण्याच्या प्रयत्नावर या अहवालात भर देण्यात आला आहे.

* अहवालाने भारताची अर्थव्यवस्था ही सतत दणकट विकासाच्या मार्गावर असल्याचे नमूद केले आहे. भारताची अर्थव्यवस्थेचा विकास दर १८-१९ मध्ये ७.३ तर १९-२० मध्ये ७.६ एवढा राहणार आहे.

* अस्थिर बाह्य आर्थिक बाजाराने निर्माण केलेली आव्हाने व रुपयाच्या होणाऱ्या घसरणीमुळे चलनवाढ होत आहे. तरीही कठोर आर्थिक धोरणामुळे चलनवाढीला आवरता येईल असे नमूद करण्यात आले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.