सोमवार, १७ सप्टेंबर, २०१८

डॉ. रघुपती सिंघानिया यांना मेक्सिकोचा सर्वोच्च सन्मान - १८ सप्टेंबर २०१८

डॉ. रघुपती सिंघानिया यांना मेक्सिकोचा सर्वोच्च सन्मान - १८ सप्टेंबर २०१८

* जे. के. टायर अँड इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष डॉ रघुपति सिंघानिया यांना नुकताच मेक्सिकोच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले.

* भारत आणि मेक्सिकोमधील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यात डॉ सिंघानिया यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मेक्सिको सरकारने त्यांचा गौरव केला.

* मेक्सिकोच्या १२८ व्या राष्ट्रीय दिवसानिमित्त मेक्सिकोच्या भारतातील राजदूत मेल्बा प्रेया यांच्या हस्ते डॉ सिंघानिया यांना [दि ऑर्डर ऑफ द अझटेक एगल] हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.

* मेक्सिको सरकारने परकी गुंतवणूकदारांना नेहमीच सहकार्य केले आहे. जे. के. टायर मेक्सिकोतील गुंतवणुकीत संदर्भातील चांगल्या आठवणी आपल्यासोबत असल्याची भावना डॉ सिंघानिया यांनी यावेळी व्यक्त केली.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.