रविवार, ३० सप्टेंबर, २०१८

दीपिका कुमारीला विश्वतिरंदाजीत कास्यपदक - १ ऑक्टोबर २०१८

दीपिका कुमारीला विश्वतिरंदाजीत कास्यपदक - १ ऑक्टोबर २०१८

* भारतीय तिरंदाज दीपिका कुमारी हिने येथे रविवारी तिरंदाजी विश्वचषक फायनलच्या तणावपूर्ण प्लेऑफ मध्ये लिजा उनरुला पिछाडीवर टाकत कास्य पदकाची कमाई केली.

* दोन्ही तिरंदाज पाच सेंट संपल्यावर ५-५ अशा बरोबरीवर होते. त्यामुळे त्यांना शूट ऑफचा सामना करावा लागला. दीपिका आणि लिजा यांनी १ गुण मिळवले. मात्र दीपिकाचा शॉट जवळ असल्याने ती विजयी ठरली.

* दीपिका हिने विश्वकप फायनलमध्ये पाचव्यांदा पदक मिळवले आहे. या आधी तीन चार वेळा रौप्यपदक विजेती राहिली आहे. पाचव्या सेटमध्ये ड्रॉसोबत दीपिका तिसरे स्थान मिळवू शकली असती.

* या स्पर्धेत भारतीय तिरंदाजानी कंपाउंड मिश्र प्रकारात एक रौप्य जिंकले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.