रविवार, ३० सप्टेंबर, २०१८

ज्येष्ठ हार्मोनियमवादक तुळशीदास बोरकर यांचे निधन - ३० सप्टेंबर २०१८

ज्येष्ठ हार्मोनियमवादक तुळशीदास बोरकर यांचे निधन - ३० सप्टेंबर २०१८

* आपल्या बोटांच्या जादुई स्पर्शाने हार्मोनियमला प्रतिष्ठा मिळवून देणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ हार्मोनियमवादक पंडित तुळशीदास बोरकर यांचे शनिवारी १० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.

* बोरकर यांचा जन्म गोव्यातील बोरी गावचा. लहानपणीच त्यांचे कुटुंब गोवा सोडून पुण्यात स्थायिक झाले. तेथेच त्यांची कारकीर्द घडत गेली.

* हार्मोनियमवादनासाठी पदमश्री आणि संगीत नाट्य अकादमीचे पुरस्कार मिळवणारे ते एकमेव कलाकार आहेत. प्रख्यात हार्मोनियमवादक मधुकर पेडणेकर यांच्याकडून पं बोरकर संवादिनी वादन शिकले.

* संगीत सौभद्र, संशय कल्लोळ, मत्स्यगंधा, मानपान, अशा त्यावेळच्या अनेक अजरामर नाट्य संगीतात त्यांनी हार्मोनियम वादन केले.

* उस्ताद आमिर खान, पं भीमसेन जोशी, जितेंद्र अभिषेकी, छोटा गंधर्व, गानसरस्वती किशोरी आमोणकर,  डॉ प्रभा अत्रे आदी संगीतातील दिग्गजाना हार्मोनियवर संगीतसाथ केली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.