शनिवार, ८ सप्टेंबर, २०१८

विशेष संपादकीय लेख - [रूपयाचे अवमूल्यन] - ८ सप्टेंबर २०१८

विशेष संपादकीय लेख - [रूपयाचे अवमूल्यन] - ८ सप्टेंबर २०१८

* गेल्या काही दिवसापासून भारतीय रुपयाची आंतरराष्ट्रीय किंमत सतत कमी होत आहे आणि गेल्या सहा दिवसात डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत तब्बल २.५० रुपयांनी घसरली आहे.

* बुधवारी शेअर बाजार बंद झाला तेव्हा रुपयाची किंमत एक डॉलरला ७१.७२ होती. ही आजवरची सर्वात कमी किंमत आहे.

[ किंमत कमी का होत आहे ]

* रुपयांच्या या घसरगुंडीला प्रामुख्याने अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार युद्ध व त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत आलेली अस्थिरता, सोन्याचे कमी होत जाणारे भाव, कच्च्या तेलाचे वाढणारे भाव ही आंतरराष्ट्रीय करणे आहेत.

* याचबरोबर देशातील अर्थव्यवस्थेतील मंदी, विदेशी गुंतवणूकदारानी भारतातून गुंतवणूक काढून घेणे. भारताच्या विदेशी व्यापारातील वाढती तूट व महागाई ही अंतर्देशीय कारणे आहेत.

* अमेरिकेने चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचे धोरण स्वीकारल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता आहे. सोन्याचे भाव सतत घसरत आहेत. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात सोने १३६२ डॉलर्स प्रति औस वरून ११९५ डॉलर्सवर आले.

* सोन्याची गुंतवणूक त्यामुळे डॉलर विनिमय व्यापारात वळली होती. परिणामी इतर चलनांच्या किमती किफायती व कमी कमी होत आहेत.

* कच्या तेलाचे भाव ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्स्पोर्टींग कंट्रीज ओपेक ठरवत असते. गेल्या वर्षी कच्चे तेल ६४ ते ६५ डॉलर्स प्रति बॅरल होते. ते बुधवारी ७८ डॉलर्सवर गेले आहे.

* भविष्यात ते १०० डॉलर्सवर जाण्याची शक्यता आहे. कच्या तेलाच्या दरवाढीमुळे पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे भारतात महागाईचा दर गेल्या एक वर्षात ४.१ टाक्यावरून ५.६ टक्यावर गेला आहे.

* देशाच्या चलनाची आंतरराष्ट्रीय किंमत ठरविण्याचे त्या देशाच्या विदेश व्यापारातील तूट वा अधिक्य महत्वाचे असते. २०१७-१८ या वर्षात भारताची एकूण निर्यात ९.८० टक्क्यांनी वाढून ३०२.८४ अब्ज डॉलर्स होती. तर आयात चक्क २०% वाढून ४५९ अब्ज डॉलर्स झाली.

* त्यामुळे विदेश व्यापारातील तूट १५६ डॉलर्स वर गेली आहे.  भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न २.२५ खर्व ट्रिलियन एवढे आहे. त्याच्या २.९० टक्के एवढी तूट आहे. रुपयांमध्ये बोलायचे झाल्यास तर ही तूट तब्बल सहा लाख कोटीच्या घरात आहेत.

* विदेशी गुंतवणूकदार फॉरेन पोर्टफोलिओ इन्वेस्टर्स एफपीआय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. या गुंतवणूक दारानी एप्रिल ते जून २०१८ या तिमाहीत साधारणतः ६१००० कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली.

* मात्र अमेरिकन गुंतवणूकदार व अर्थतज्ञ निक पोल्सन यांनी शेअर बाजार ३८०१८ व निफ्टी ११४७६ अशा सुदृढ स्थितीत असल्याने भारताने फारशी काळजी करण्याची गरज नसल्याचे भाकीत केले आहे. ते खरे ठरते काय की रुपया आणखी गडगडतो ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.