मंगळवार, ११ सप्टेंबर, २०१८

यूएस ओपन २०१८ चे विजेतेपद नोव्हाक जोकोव्हिचला - १० सप्टेंबर २०१८

यूएस ओपन २०१८ चे विजेतेपद नोव्हाक जोकोव्हिचला - १० सप्टेंबर २०१८

* न्यूयॉर्क अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिच सोमवारी अंतिम लढतीत अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोत्रेला पराभूत करत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. 

* त्याने ६-३, ७-६, ६-३ अशा फरकाने बाजी मारताना तिसऱ्यांदा अमेरिकन स्पर्धा जिंकली. या जेतेपदावर बरोबर त्याने पीट सॅम्प्रास यांच्या १४ ग्रँड स्लॅम जेतेपदाच्या विक्रमाशी बरोबरी केली. 

* जोकोव्हिच सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकणाऱ्या खेळाडूत रॉजर फेडरर २० आणि राफेल नदाल १७ यांच्यानंतर तिसऱ्या स्थानी आहे. 

* जोकोव्हिचने २०११ व २०१५ मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली होती. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या डेल पोत्रोसाठी हा पराभव वेदनादायी होता. ९ वर्षानंतर दुसऱ्यांदा डेल पोत्रेने ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.