शनिवार, १ सप्टेंबर, २०१८

रंजन गोगोई भारताचे नवे सरन्यायाधीश - २ सप्टेंबर २०१८

रंजन गोगोई भारताचे नवे सरन्यायाधीश - २ सप्टेंबर २०१८

* काही महिन्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे न्यायमूर्ती रंजन गोगोई यांची भारताचे नवे नवे सरन्यायाधीश म्हंणून नियुक्ती होणार आहे. 

* ते येत्या ३ ऑकटोबर रोजी आपल्या पद व गोपनीयतेची शपत घेतील. या विषयाची अधिकृत घोषणा लवकरच अपेक्षित आहे. 

* सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी शनिवारी आपले उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली. 

* सुप्रीम कोर्टाच्या परंपरेनुसार सर्वात ज्येष्ठतम न्यायाधीशाची निवड सरन्यायाधीशपदी केली जाते. मिश्रा यांनी या परंपरेला अनुसरून ही शिफारस केली आहे. 

* याविषयी आता केवळ औपचारिक घोषणेचा अवकाश आहे. सरन्यायाधीश मिश्रा येत्या येत्या २ ऑकटोबर रोजी सरन्यायाधीश सेवानिवृत्त होतील. 

* न्यायमूर्ती गोगई यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९५४ रोजी आसाममध्ये झाला. त्यांनी १९७८ मध्ये वकिली सुरु केली. २८ फेब्रुवारी २००१ रोजी ते गुवाहाटी उच्च न्यायालयात नायायाधीश म्हणून रुजू झाले. 

* तदनंतर ९ सप्टेंबर २०१० रोजी त्यांची पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.