शुक्रवार, २१ सप्टेंबर, २०१८

व्हिएतनामच्या राष्ट्रपतींचे दीर्घ आजाराने निधन - २२ सप्टेंबर २०१८

व्हिएतनामच्या राष्ट्रपतींचे दीर्घ आजाराने निधन - २२ सप्टेंबर २०१८

* व्हिएतनामचे राष्ट्रपती त्रान दाई क्वाग यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी निधन झाले. ते ६१ वर्षाचे होते. देशाच्या शासकीय माध्यमाने त्यांची प्राणज्योत मालवल्याची अधिकृत घोषणा केली आहे.

* व्हिएतनामचे अतिशय कणखर, संयमी व संघर्षशील व्यक्ती म्हणून क्वाग लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

* राष्ट्रपती क्वाग यांना गंभीर आजार जडला होता. त्यांच्यावर राजधानी हनोईस्थित १०८ लष्करी रुग्णालयात उपचार सुरु होते. शुक्रवारी सकाळी त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.