गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१८

समलैंगिक संबंध कायदा ३७७ कलम अवैध - ७ सप्टेंबर २०१८

समलैंगिक संबंध कायदा ३७७ कलम अवैध - ७ सप्टेंबर २०१८

* भारतीय दंड संहितेतील ३७७ कलम अवैध असून समलैंगिक संबंध गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला.  त्यामुळे भारतात दोन समलैंगिक सज्ञान लोकांमधील लैंगिक संबंध गुन्हा ठरणार नसून न्यायालयाच्या या निर्णयामुळे समलैंगिक समुदाय [एलजीबीटी] ला मोठा दिलासा मिळाला आहे.

* सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील न्यायमूर्ती रोहिंटन नरिमन, ए एम खानविलकर, डी वाय, चंद्रचूड आणि इंदू मल्होत्रा यांच्या घटनापीठाने हा ऐतिहासिक निकाल दिला.

* कलम ३७७ नुसार समलिंगी संबंधाना अवैध व गुन्हा मानण्यात आले होते.  हा कायदा तर्कहीन आणि मनमानी करणारा असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले होते.

* सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी संबंधांना वैध ठरवत हा कायदा रद्द ठरविला होता. हा कायदा तर्कहीन आणि मनमानी करणारा असल्याचेही निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

* निकालातील ठळक मुद्दे -
* सहमतीने एकांतात समलैंगिक संबंध ठेवणे गुन्हा नाही.
* जुनी विचारधारा बदला, लोकांनी मानसिकता बदलावी.
* प्रत्येकाला मर्जीने जगण्याचा अधिकार.
* कोणाच्याही बाबतीत भेदभाव करता येणार नाही.
* न्यायालयाने समलैगिंक संबंध गुन्हा नसल्याचे सांगतानाच अल्पवयीन मुले आणि प्राणी यांच्याही अनैसर्गिक संभोग करणे हा कलम ३७७ अंतर्गत गुन्हाच राहणार.

* २०१३ मध्ये सुरेशकुमार विरुद्ध नाझ फाउंडेशन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्ती खंडपीठाने हा निर्णय बदलला होता. त्याविरोधात ही याचिका करण्यात आली होती. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.