बुधवार, १२ सप्टेंबर, २०१८

हॉकीपटू सरदार सिंगची हॉकीमधून निवृत्ती - १२ सप्टेंबर २०१८

हॉकीपटू सरदार सिंगची हॉकीमधून निवृत्ती - १२ सप्टेंबर २०१८

* भारतीय संघाचे कर्णधारपद भूषविणारा दिग्गज खेळाडू सरदारसिंग याने बुधवारी आंतरराष्ट्रीय हॉकीतून निवृत्ती जाहीर केली. गेली १२ वर्षे मी सातत्याने खेळलो असून आता युवा खेळाडूंना संधी देण्याची वेळ आहे. 

* २००६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघात पदार्पण, १२ वर्षाच्या करियरमध्ये मधल्या फळीतील महत्वाचा खेळाडू, ३२ वर्षाचा सरदार देशासाठी ३५० आंतरराष्ट्रीय सामने खेळला.

* २००८ ते २०१६ दरम्यान भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्यानंतर संघाने नेतृत्व पीआर श्रीजेशकडे सोपविण्यात आले. २००८ मध्ये सुलतान अझलन शाह चषकात भारताचे नेतृत्व करणारा सर्वात युवा कर्णधार.

* २०१२ मध्ये सरदारला अर्जुन पुरस्कार आणि २०१५ मध्ये पदमश्री पुरस्कारावर देऊन गौरविण्यात आले. दोन ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधी करणारा खेळाडू.

* हरियाणातील सिरसा येथील रहिवासी असलेल्या सरदारांच्या करिअरला वादाचे गालबोटही लागले होते.  भारतीय वंशाच्या ब्रिटिश महिलेने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केले. पण त्याला त्यातून क्लीन चिट मिळाली.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.