मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१८

विश्वचषक नेमबाजीमध्ये मिथरवालला सुवर्णपदक - ५ सप्टेंबर २०१८

विश्वचषक नेमबाजीमध्ये मिथरवालला सुवर्णपदक - ५ सप्टेंबर २०१८

* भारतीय नेमबाज ओमप्रकाश मिथरवालने मंगळवारी येथे ५० मीटर पिस्तूल स्पर्धेत अव्वल स्थान पटकावताना आयएसएसएफ विश्वचषक चॅम्पियनशिपमध्ये प्रथमच वैयक्तिक सुवर्णपदकाला गवसणी घातली.

* यंदा गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल व ५० मीटर पिस्तूल स्पर्धेत कास्यपदकाचा मानकरी ठरलेला २३ वर्षाचा मिथरवाल ५६४ अंकासह अव्वल स्थानी आहे.

* ज्युनिअर गटात आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता सौरभ चौधरी व अभिदण्या पाटीलने १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत मिश्र स्पर्धेत कास्यपदक पटकाविले.

* या दोन पदकासह भारताने १२ वर्षांपूर्वी जागरेबमध्ये सहा पदकांच्या आपल्या सर्वोत्तम कामगिरीला पिछाडीवर सोडले.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.