शुक्रवार, ७ सप्टेंबर, २०१८

भारतातील रोजगारवाढीत तंत्रज्ञान क्षेत्र आघाडीवर - ७ सप्टेंबर २०१८

भारतातील रोजगारवाढीत तंत्रज्ञान क्षेत्र आघाडीवर - ७ सप्टेंबर २०१८

* भारतातील रोजगार वाढीमध्ये तंत्रज्ञान क्षेत्र आघाडीवर आहे. सर्वाधिक वेगाने रोजगारवाढ नोंदविणाऱ्या टॉप-५ नोकऱ्या तंत्रज्ञान क्षेत्रातील आहेत. तसेच टॉप १० मधील ८ नोकऱ्या तंत्रज्ञानविषयक आहेत.

* एका संस्थेने पाहणीनंतर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, मशीन लर्निग इंजिनिअर, एप्लिकेशन डेव्हलोपमेंट अनॅलिस्ट,बॅक एंड डेव्हलपर, फुल स्टेक इंजिनिअर आणि डाटा सायन्टीन्स या देशातील सर्वाधिक वेगवान वृद्धी नोंदविणाऱ्या टॉप ५ नोकऱ्या ठरल्या आहेत.

* सन २०१३ या काळात एक दशलक्ष लिंक्डइन सदस्यांनी आपल्या प्रोफाईलवर नोंदविलेल्या टॉप ५ नोकऱ्या ठरल्या आहेत. सन २०१३ आणि २०१७ या काळात एक दशलक्ष लिंक्डइन सदस्यांनी आपल्या प्रोफाईलवर नोंदविलेल्या अनुभवाच्या आधारे हा अहवाल तयार केला आहे. 

* या प्लॅटफॉर्मवर ५० दशलक्षापेक्षा जास्त प्रोफाइल आहेत. सर्वेक्षण काळात टॉप-५ नोकऱ्यांत अनुक्रमे ४३, ३२, २३, १८ आणि १४ पट वाढ झाली आहे. रोजगार क्षेत्राचा चेहरा बदलत असल्याचेही दिसून येत होते. ते आता नव्या कौशल्याकडे अधिक झुकत आहे.

* बँकिंग, वित्तीय सेवा, आणि विमा बीएफएसआय, वस्तू उत्पादन, माध्यम, व मनोरंजन, व्यवसायिक सेवा, किरकोळ विक्री व ग्राहक उत्पादने आणि तंत्रज्ञान सॉफ्टवेअर या क्षेत्रातील शीर्षक संस्था उत्पादन वाढ, कार्यक्षमता व वृद्धी यासाठी नवतंत्रज्ञान शोधत आहेत. त्यामुळे मशीन लर्निग इंजिनिअर आणि डेटा सायंटिस्ट यांना मोठी मागणी आली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.