रविवार, १६ सप्टेंबर, २०१८

क्षयरोग उच्चाटनासाठी यूएनची जागतिक योजना - १४ सप्टेंबर २०१८

क्षयरोग उच्चाटनासाठी यूएनची जागतिक योजना - १४ सप्टेंबर २०१८

* जीवघेण्या क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जागतिक पातळीवर लवकरच एक योजना आखली जाणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांनी अशा प्रकारची योजना तयार करण्यावर सहमती दर्शविली आहे.

* त्यानुसार क्षय रुग्णांना अल्पदरात औषध उपलब्द करून देण्याबरोबर अमेरिकेसोबत या मुद्यावर सुरु असलेला वाद सोडविण्यावर भर दिला जाणार आहे.

* संसर्गजन्य रोगांपैकी जगभरात सर्वाधिक मृत्यू हे क्षयरोगामुळे होतात. त्यामुळे २०३० पर्यंत हा जीवघेणा आजार पूर्णपणे नियंत्रणात आणण्याचा विडा संयुक्त राष्ट्राने उचलला आहे.

* अनेक आठवडे चाललेल्या क्लिष्ट चर्चेनंतर अखेर शुक्रवारी अंतिम घोषणापत्राला मंजुरी देण्यात आली. न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या बैठकीव्यतिरिक्त २६ सप्टेंबर रोजी पहिल्यांदाच क्षयरोगावर शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

* या परिषदेमध्ये अधिकृतरित्या घोषणापत्र स्वीकारले जाईल. अल्प दरातील औषधें गरीब राष्ट्रापर्यंत पोहोचत नसल्यावरून दक्षिण आफ्रिकेची अमेरिकेसोबत चांगलीच खडाजंगी झाली होती.

* दोन्ही देशामध्ये झालेले हे वाकयुद्ध कथित ट्रिप्स व्यापार व्यवस्थपनसंदर्भात होते. हे व्यवस्थापन बौद्धिक संपदेच्या हक्कांशी निगडित आहे.

* ५३ सूत्री अंतिम घोषणापत्रानुसार शिखर परिषदेमध्ये जागतिक नेते २०३० पर्यंत क्षयरोगाचा नायनाट करण्याची कटिबद्धता व्यक्त करतील.

* हे ध्येय गाठण्यासाठी वर्षाला १३ अब्ज डॉलरचा खर्च केला जाईल. याशिवाय क्षयरोगासंदर्भात संशोधनासाठी जगभरात दोन अब्ज डॉलरचा अतिरिक्त निधी खर्च केला जाईल.

* संसर्गजन्य रोगामध्ये क्षयरोगाने एड्ससारख्या घातक आजारांना मागे सोडल्याचे संस्थेने म्हटले होते. जगभरात होणाऱ्या मृत्यूच्या कारणांमध्ये क्षयरोग नवव्या क्रमांकावर आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.