रविवार, १६ सप्टेंबर, २०१८

हैद्राबादमध्ये देशातील पहिले श्वान उद्यान - १६ सप्टेंबर २०१८

हैद्राबादमध्ये देशातील पहिले श्वान उद्यान - १६ सप्टेंबर २०१८

* तेलंगणाची राजधानी हैद्राबादमध्ये पाळीव श्वानासाठी देशातील पहिला [डॉग पार्क] उघडण्यात आले आहे. अत्याधुनिक सुविधानीयुक्त आहे या विशेष उद्यानामध्ये पाळीव कुत्र्यांनी स्वछंद्पणे भटकंती करता येईल.
पुढच्या १० दिवसामध्ये या उद्यानाचे जंगी उदघाटन करण्यात येईल.

* ग्रेटर हैद्राबाद महानगरपालिकेने जीएचएमसी कोंडापुरमधील १.३ एकर जागेवर हे विशेष श्वान उद्यान तयार केले आहे. यासाठी जवळपास १.१ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

* पार्कमध्ये कुत्र्यांच्या फिरण्यासाठी विशेष ट्रॅक आणि उपचारासाठी रुग्णालय उघडण्यात आले आहे. याशिवाय कुत्र्यांना लागणाऱ्या सर्व आवश्यक गोष्टी याठिकाणी उपलब्द करून देण्यात आल्या आहेत.

* यामध्ये प्रशिक्षण देणारे उपकरण आणि व्यायामाच्या साहित्यासह अन्य बाबीचा समावेश आहे. देशातील पहिल्या प्रमाणित डॉग पार्कमध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.

* या ठिकाणी श्वानांना प्रशिक्षित करण्यासाठी खास प्रशिक्षकाचा समावेश करण्यात आला. तसेच कुत्र्यांना मोफत लस देण्याची सुविधादेखील पार्कमध्ये आहे. अशी माहिती जीएमएमसी चे विभागीय आयुक्त डी हरिचंदा यांनी दिला.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.