शुक्रवार, २१ सप्टेंबर, २०१८

टांझानियात २०० जणांना जलसमाधी - २२ सप्टेंबर २०१८

टांझानियात २०० जणांना जलसमाधी - २२ सप्टेंबर २०१८

* पूर्व आफ्रिकन राष्ट्र टांझानियातील सुप्रसिद्ध व्हीकटोरीया सरोवरात प्रवाशांनी खचाखच भरलेली एक नौका शुक्रवारी अचानक बुडाली आहे.

* यात साधारणतः २०० जणांना जलसमाधी मिळाल्याचे वृत्त आहे. या घटनेतून ३७ जणांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.

* नौका पालटल्याच्या घटनेची पुष्टी टांझानियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली आहे. नौकेची वहन क्षमता ही १०० असतानाही तिच्यातून साधारणतः ४०० हुन अधिक जण प्रवास करीत होते. नेमक्या याच कारणामुळे व्हीकटोरीया सरोवरात ही नौका वाहून गेली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.