शनिवार, १ सप्टेंबर, २०१८

महाराष्ट्रात ११ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होणार - २ सप्टेंबर २०१८

महाराष्ट्रात ११ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होणार - २ सप्टेंबर २०१८

* देशात अधिकाधिक पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्याच्या योजनेचा भाग म्हणून महाराष्ट्रात ११ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यात येणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सचिव डॉ ज्ञानेंश्वर मुळे यांनी ही माहिती दिली.

* परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जानेवारी २०१७ मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार देशात २८९ पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यात येणार आहेत.

* यापैकी २१८ केंद्र सुरु करण्यात आले. हे लक्ष्य पूर्ण करण्यात आले. आता आणखी त्यात ८७ केंद्राची भर पडली असून ते लवकरच सुरु करण्यात येतील. महाराष्ट्रात सध्या २५ सेवा केंद्रे आहेत.  यात ११ ची भर पडणार असून एकूण संख्या ३६ होणार आहे.

* महाराष्ट्रातील ज्या शहरात नवे पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होणार आहेत. त्यात भंडारा, भिवंडी, बुलढाणा, धुळे, गडचिरोली, हिंगोली, उस्मानाबाद, परभणी, रायगड, रामटेक, रावेर या शहराचा समावेश आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.