गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१८

हॉलिवूड अभिनेते बर्ट रेनॉल्डस यांचे निधन - ७ सप्टेंबर २०१८

हॉलिवूड अभिनेते बर्ट रेनॉल्डस यांचे निधन - ७ सप्टेंबर २०१८

* हॉलीवूड अभिनेते बर्ट रेनॉल्डस यांचे हृदयविकाराच्या झटक्याने फ्लोरिडा येथे निधन झाले. ते ८२ वर्षाचे होते. डॅन ऑगस्ट आणि गन स्मोकसारख्या अनेक टीव्ही शोमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या होत्या.

* तर १९९७ मध्ये बुगी नाईट्स या सिनेमासाठी ऑस्कर नामांकन मिळाले होते. इव्हिनीग शेड्स या सिनेमातील भूमिकेसाठी बर्ट रेनॉल्ड्स यांना गोल्डन ग्लोब पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

* एंजल बेबी हा १९६१ मध्ये आलेला त्यांचा पहिला सिनेमा होता. अवर मॅन फ्लिंट, व्हाईट लाइटनीग, द मॅन हू लव्ह्ड कॅट डान्सिंग, लकी लेडी यासारख्या सिनेमांनी त्यांना प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले.

* त्यांना जेम्स बॉण्डच्या भूमिकेसाठी विचारणा झाली होती. मात्र एक अमेरिकन अभिनेता कधीही जेम्स बॉण्ड साकारू शकत नाही असे म्हणत त्यांनी ती नाकारली.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.