बुधवार, १२ सप्टेंबर, २०१८

पुढील ३ वर्षात देशातील सर्व ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण - १२ सप्टेंबर २०१८

                                                      पुढील ३ वर्षात देशातील सर्व ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण - १२ सप्टेंबर २०१८
* भारतीय रेल्वेच्या देशभरातील अद्यापही विद्युतीकरण न झालेल्या १३,६७५ किमीच्या मार्गांचे विद्युतीकरण करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. 

* या कामास १२,१३४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून ब्रॉडगेज रेल्वेमार्गाला शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण झाल्यावर रेल्वेच्या इंधनावरील खर्चात दरवर्षी १३,५१० कोटी रुपयांची बचत होईल.

* हे विद्युतीकरण काम सन २०२१-२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. सर्वाधिक वाहतूक असलेल्या सर्व महत्वाच्या रेल्वेमार्गाचे याआधीच विद्युतीकरण झालेले आहे. 

* मात्र अधल्या-मधल्या किंवा अगदी टोकाच्या काही मार्गांचे विद्युतीकरण झालेले नसल्याचे त्याठिकाणी सध्या इंजिने बदलावी लागतात. पूर्ण विद्युतीकरण झाल्यावर रेल्वेची कार्यक्षमता, वेग, सुरक्षितता, व वहनक्षमता वाढेल. 

* सध्या रेल्वेच्या एकूण मालवाहतुकीपैकी सुमारे ७५% वाटा प्रवासी वाहतुकीपैकी निम्म्याहून अधिक वाहतूक विजेवर चालणाऱ्या गाड्यांचीच होत असली तरी एकूण इंधनामध्ये विजेचा वाटा फक्त ३७% आहे.  

* विजेचा वापर वाढवल्यावर डिझेलचा वापर २.८३ अब्ज लिटरने कमी होईल, या विद्युतीकरणाच्या कामाने २०.४ कोटी नवे थेट रोजगार उपलब्द होतील. असे सरकारचे म्हणणे आहे. 

* यासाठी खर्च १२,००० कोटी खर्च अपेक्षित, १३५१० कोटी वर्षाला इंधनाची बचत, २.८३ अब्ज लिटरने डिझेलचा वापर कमी, ग्रीन हाऊस गॅसचे उत्सर्जन २४% कमी होणार. २० लाख नवीन रोजगार उपलब्द होतील. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.