बुधवार, २६ सप्टेंबर, २०१८

मुकेश अंबानी सलग ७ व्या वर्षी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती - २६ सप्टेंबर २०१८

मुकेश अंबानी सलग ७ व्या वर्षी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती - २६ सप्टेंबर २०१८

* रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या मिळकतीत वर्षभरात दररोज ३०० कोटी रुपयाची वाढ झाली आहे. वार्कलेस हुरून इंडियाने मंगळवारी भारतीय श्रीमंतांची यादी जाहीर केली. त्यानुसार रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सच्या किमतीत वर्षभरात ४५ टक्के वाढ झाली.

* अहवालानुसार मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ३ लाख ७१ हजार कोटी असून श्रीमंतांच्या या यादीत ते सलग ७ व्या वर्षी अग्रस्थानी आहेत.

* त्यांच्यानंतर अनुक्रमे एस पी हिंदुजा १ लाख ५९ हजार, लक्ष्मी नारायण मित्तल १ लाख १४ हजार कोटी, अझीम प्रेमजी ९६ हजार १०० कोटी, हे अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या, स्थानी आहेत.

* सन फार्मा कंपनीचे दिलीप संघवी यांची संपत्ती ८९ हजार ७०० कोटी, उदय कोटक ७१ हजार ६००, सायरस पुनावाला ७३ हजार कोटी, गौतम अदानी ७१ हजार २००, व सायरस पालनजी ६९ हजार ४०० कोटी यांचा यादीत समावेश आहे.

* अहवालात श्रीमंत कुटुंबाची यादीही जाहीर केली. त्यातही अंबानी कुटुंबीय अग्रस्थानी आहेत. त्यापाठोपाठ गोदरेज, हिंदुजा, मिस्त्री, संघवी, नादर, अदानी, दमाणी, लोहिया, व बर्मन या कुटुंबाचा क्रमांक लागतो. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.