गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१८

दिव्यांश सिंग व श्रेया अगरवालला कांस्यपदक - ६ सप्टेंबर २०१८

दिव्यांश सिंग व श्रेया अगरवालला कांस्यपदक - ६ सप्टेंबर २०१८

* भारताचे वरिष्ठ नेमबाज अपयशी ठरत असताना युवा नेमबाज दिव्यांश सिंग आणि श्रेया अगरवालने ज्युनियर मिश्र सांघिक गटात १० मीटर्स एअर रायफल प्रकारात कांस्यपदक पटकाविले.

* आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारताच्या एकाही खेळाडूला पदक मिळविता आले नाही.

* पात्रता फेरीत दाखल झालेल्या ४२ संघामधून दिव्यांश सिंग आणि श्रेया अगरवालने ८३४.४ गुण मिळवत पाचवे स्थान मिळवत अंतिम फेरीत स्थान गाठले.

* या फेरीत भारताच्या युवा नेमबाजांनी मिळून ४३५ गुण मिळवत तिसऱ्या स्थानासह कास्यपदकही पटकावले. भारताला आता तीन सुवर्णपदक, तीन रौप्यपदक आणि तीन कांस्यपदक मिळाली आहेत.

* भारतीय नेमबाजी संघ आता विश्वक्रमवारीत संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर असून यजमान कोरिया आणि चीन हे आघाडीवर आहेत.

* पुरुषांच्या ५० मीटर्स रायफल प्रोन स्पर्धेत चरण सिंगल चौदावे तर आशिया क्रीडा स्पर्धात रौप्यपदक पटकाविणाऱ्या संजीव राजपूतला केवळ ६२० गन मिळाले.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.