गुरुवार, २० सप्टेंबर, २०१८

२०५० पर्यंत भारत अमेरिकेला मागे टाकणार - २० सप्टेंबर २०१८

२०५० पर्यंत भारत अमेरिकेला मागे टाकणार - २० सप्टेंबर २०१८

* जागतिक आर्थिक आणि रणनीतीक सत्ताकेंद्र हळूहळू पूर्वेकडे सरकत आहे. जगातील चार मोठ्या अर्थव्यवस्था पैकी तीन अर्थव्यवस्था आशिया प्रशांत क्षेत्रातील आहेत.

* २०२५ पर्यंत जागतिक लोकसंख्येपैकी २/३ लोकसंख्या याच क्षेत्रात राहील. या क्षेत्रात भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने विकसित होत असून २०५० पर्यंत ती अमेरिकेलाही मागे टाकील असे एका अहवालात म्हटले आहे.

* लोई इन्स्टिट्यूटने जारी केलेल्या सर्वेक्षण अहवालानुसार, अमेरिकेची शक्ती क्षीण होत असली तरीही आशिया प्रशांत विभागातून अजूनही अमेरिका एक प्रचंड अर्थव्यवस्था असुन तिचा प्रभाव आहे.

* या विभागात एकूण २५ प्रभावशाली देश आहेत. ज्यात भारत चौथ्या तर पाकिस्तान १४ व्या स्थानी आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत भारत व चीन यांच्यात असलेली मोठी दरी भरून काढणे भारताला नजीकच्या काळात तरी शक्य होणार नाही.

* पण आगामी ११ वर्षात भारत अमेरिकेच्या जवळ पोहोचलेला असेल. २०५० सालापर्यंत भारत अमेरिकेला मागे टाकेल. मात्र भारताच्या मार्गात काही अडथळे आहेत.

* उत्पादन क्षमता, संशोधन व विकास या मापदंडात भारत खूपच मागे पडत आहे. साधने आणि मनुष्यबळ यांचा पूर्ण वापर करणे भारताला शक्य होताना दिसत नाही. असे अहवालात म्हटले आहे.

* आशिया प्रशांत टॉप टेन देश पुढीलप्रमाणे - अमेरिका, चीन, जपान, भारत, रशिया, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया.

* हा अहवाल ११४ मापदंडाच्या आधारे विविध देशांच्या अर्थव्यवस्थांबाबत हा अहवाल तयार केला असून त्यात, देशाची अर्थव्यस्थेची सद्यस्थिती, लष्कर, मुत्सद्देगिरी आणि सांस्कृतिक प्रभाव या क्षेत्रचा विचार करण्यात आला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.