गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१८

तेलंगणामध्ये विधानसभा बरखास्त करण्याचा राज्यसरकारचा निर्णय - ६ सप्टेंबर २०१८

तेलंगणामध्ये विधानसभा बरखास्त करण्याचा राज्यसरकारचा निर्णय - ६ सप्टेंबर २०१८

* तेलंगणामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंळाने विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

* मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर राज्यपाल ईएसएल नरसिंहन यांची भेट घेतली. तसेच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन राज्याची विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस राज्यपालांकडे केली आहे.

* त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच तेलंगणामध्ये विधानसभेसाठी रणधुमाळी रंगणार आहे. नव्याने अस्तित्वात आलेल्या तेलंगणामध्ये २०१४ साली विधानसभेसाठी पहिल्यांदाच निवडणूक झाली होती.

* तेलंगणा विधानसभेची मुदत २०१९ मध्ये संपणार आहे.  विधानसभा आणि लोकसभेसाठी एकत्रच निवडणूक होणे शक्य असल्यास मात्र राज्यातील राजकीय समीकरणाचा विचार करून त्यांनी हा निर्णय घेतला.

* तेलंगणाचे राज्यपाल ईएसएल नरसिहंन यांनी राज्य मंत्रिमंडळाचा प्रस्ताव स्वीकारला आहे.  त्यामुळे दिवाळीतच तेलंगणामध्ये निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.