शुक्रवार, २१ सप्टेंबर, २०१८

जागतिक बँकेचे भारताला ३० अब्ज डॉलरचे अर्थसहाय्य मिळणार - २२ सप्टेंबर २०१८

जागतिक बँकेचे भारताला ३० अब्ज डॉलरचे अर्थसहाय्य मिळणार - २२ सप्टेंबर २०१८

* जागतिक बँकेने भारतासोबतच्या अत्यावश्यक पंचवार्षिक आराखड्यास मंजुरी दिली असून त्यानुसार बँकेकडून भारताला २५ ते ३० अब्ज डॉलरचे अर्थसहाय्य मिळणार आहे. यामुळे कनिष्ठ-मध्यम उत्पन्न गटातून उच्च मध्यम उत्पन्न देशांच्या गटात जायला मदत होईल. 

* बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की बँकेने भारतासाठी [ कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्क ] ला मंजुरी दिली आहे. भारताला उच्च मध्यम उत्पन्न देश बनवण्यासाठी ही मदत उपयोगाची ठरेल.

* त्याच्या द्वारे भारताला संसाधन कार्यक्षम व एकात्मिक वृद्धी, रोजगार निर्मिती व मनुष्यबळ भांडवल उभारणी अशा महत्वाच्या क्षेत्रातील समस्यांवर मार्ग काढता येईल.

* या वित्तसंस्थाकडून भारताला २५ ते ३० अब्ज डॉलरचे अर्थसहाय्य मिळणार आहे. या वित्त संस्थात आंतरराष्ट्रीय पुनर्बांधणीची व विकास बँक आयबीआरडी, आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळ आयएफसी, आणि बहुविध गुंतवणूक हमी संस्था मिगा, यांचा समावेश आहे.

* जागतिक बँकेचे दक्षिण आशियाई विभाग प्रमुख हार्टविग शाफेर यांनी सांगितले की सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असलेल्या भारताने गेल्या दशकात सर्वाधिक लोकांना दारिद्र्यरेषेतून बाहेर काढले आहे. तसेच २०३० पर्यंत उच्चमध्यम उत्पन्न देश बनेल.

* जागतिक बँकेचे भारतातील संचालक जुनैद अहमद यांनी सांगितले की हा भारतासोबतचा जागतिक बँकेचा पहिला भागीदारी आराखडा आहे.

* याअंतर्गत आम्ही पाच वर्षे एकत्र काम करू. गेल्या अनेक दशकापासून भारताने प्राप्त केलेल्या अतुलनीय वृद्धीची जागतिक बँकेने दखल घेतली आहे. त्यानुसार हे अर्थसहाय्य देण्यात येत आहे.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.