मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१८

पीटीआयचे डॉ. अल्वी पाकिस्तानचे नवे राष्ट्रपती - ५ सप्टेंबर २०१८

पीटीआयचे डॉ. अल्वी पाकिस्तानचे नवे राष्ट्रपती - ५ सप्टेंबर २०१८

* सत्ताधारी 'पाकिस्तान तहरीक ए इन्साफ' पक्षाचे संस्थापक सदस्य तथा नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांचे विश्वासू सहकारी डॉ अरिफ अल्वी यांची मंगळवारी पाकचे १३ वे राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे.

* पाक राष्ट्रपतीसाठी मंगळवारी निवडणूक झाली. या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे उमेदवार डॉ आरिफ अल्वी यांना पीपीपी चे चौधरी एतजाज एहसान व जमियत ए उलेमा च्या एफ मौलाना फजल उर रहमान यांनी आव्हाहन दिले होते.

* त्यात अल्वी यांना नॅशनल असेम्ब्ली व सिनेटच्या एकूण ४३० मतांपैकी सर्वाधिक २१२ मते पडली. तर रहमान व एहसान यांना अनुक्रमे १३१ व ८१ मतावर समाधान मानावे लागले.

* पाकमध्ये राष्ट्रपती हा देशाचा नामधारी प्रमुख असतो. सर्व प्रशासकीय अधिकार हे पंतप्रधानांच्या स्वाधीन असतात. विद्यमान राष्ट्रपती ममनून हुसेन यांचा कार्यकाळ येत्या ८ तारखेला संपुष्टात येणार आहेत.

* ६९ वर्षीय अल्वी हे दंतरोग तज्ञ असून सत्ताधारी पीटीआयचे संस्थापक सदस्य आहेत. २००६ ते २०१३ पर्यंत ते पक्षाच्या सरचिटणीसपदी होते. गत २५ जुलै रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते कराचीच्या एनए २४७ मतदारसंघातून विजयी झाले होते.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.