सोमवार, १७ सप्टेंबर, २०१८

केनियाच्या एलीऊदचा मॅरेथॉनमध्ये विश्वविक्रम - १८ सप्टेंबर २०१८

केनियाच्या एलीऊदचा मॅरेथॉनमध्ये विश्वविक्रम - १८ सप्टेंबर २०१८

* केनियाच्या एलीऊद किपचोगेने मॅरेथॉनमध्ये २ तास, एक मिनिट आणि ४० सेकंद असा विश्वविक्रम नोंदवत उल्लेखनीय कामगिरी केली.

* ३३ वर्षीय ऑलिम्पिक विजेत्या कीपजोगेने डेनिस किमेटोने चार वर्षांपूर्वी नोंदविलेला दोन तास, दोन मिनिटे आणि ५७ सेकंदात पार केले. तर १० किलोमीटरचा टप्पा त्याने २९ मिनिटे २१ सेकंदात पूर्ण केला. त्याने ३५ किलोमीटर अंतर एक तास ४१ मिनिटात पूर्ण केले होते.

* कीपचोगेने २०१३ मध्ये हॅम्बुर्ग येथील मॅरेथॉन शर्यतींद्वारे या लांब अंतराच्या धावण्याच्या स्पर्धेला गांभीर्याने प्रारंभ केला. त्याने पाच हजार धावण्याच्या शर्यतीत २००३ मध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेतील सुवर्ण, तर २००७ मध्ये रौप्यपदक मिळविले.

* मॅरेथॉनमधील यशाबद्दल माझ्याकडे शब्द अपुरे आहेत. मी सर्व चाहते, प्रशिक्षक, पालक व देवाचे आभार मानतो. ही शर्यत जिंकण्याची मला खात्री होती. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.