शुक्रवार, २८ सप्टेंबर, २०१८

सातारा देशातील सर्वात स्वच्छ जिल्हा - २८ सप्टेंबर २०१८

सातारा देशातील सर्वात स्वच्छ जिल्हा - २८ सप्टेंबर २०१८

* स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. स्वच्छ  सर्वेक्षण २०१८ ग्रामीण मध्ये सातारा जिल्हा परिषदेने देशात सर्वात स्वच्छ जिल्हा होण्याचा मान मिळवला आहे.

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २ ऑक्टोबरला राष्ट्रपती भवनात हे पारितोषिक दिले जाणार आहे. सातारा जिल्हा परिषदेने यापूर्वी शौचालय बांधून हागणदारीमुक्त जिल्हा करण्यात देशात तृतीय क्रमांक मिळविला आहे.

* देशातील सर्व जिल्ह्यामध्ये केंद्राच्या स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्रालयाने सर्वेक्षण केले होते. सार्वजनिक स्वच्छतेच्या निरीक्षणास ३० गुण, नागरिक मुख्य प्रभावी व्यक्तींची स्वच्छतेबाबतची माहिती, मते व अभिप्रायास ३५ गुण व स्वचछताविषयक सद्यस्थितीला ३५ असे १०० गुणांकामध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते.

* यात सातारा जिल्ह्याने देशात सर्वाधिक गुण मिळविले या सर्वेक्षणात देशातील ६९८ जिल्ह्यातील ६९८० खेडी सहभागी झाली होती. ३४९०० सार्वजनिक ठिकाणाचा ज्यात शाळा अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आठवडी बाजार, धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करण्यात आले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.