शुक्रवार, २१ सप्टेंबर, २०१८

जपानमध्ये पंतप्रधानपदाची शिंजो ऍबेची हॅट्रिक - २१ सप्टेंबर २०१८

जपानमध्ये पंतप्रधानपदाची शिंजो ऍबेची हॅट्रिक - २१ सप्टेंबर २०१८

* जपानमधील सत्तारूढ लिबरल डेमोक्रेटिक पक्षाच्या नेतेपदी ६३ वर्षीय शिंजो ऍबे यांची गुरुवारी बहुमताने निवड झाली आहे.

* त्यामुळे देशाच्या पंतप्रधानपदी पुढील तीन वर्षे कायम राहण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. याबरोबर शिंजो ऍबेनि पंतप्रधानपदी हॅट्रिक केली आहे.

* देशावर प्रदीर्घकाळ सत्ता गाजवण्यासाठी संधी ऍबेना मिळाली असून राज्यघटना बदलण्याचे स्वप्न त्यांचे पूर्ण होणार आहे.

* सत्ताधारी लिबरल डेमोक्रेटिक पक्षाच्या नेतेपदी झालेल्या निवडणुकीत ६३ वर्षीय रूढीवादी शिंजो ऍबे यांना ५५३ मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिद्वंदी तथा माजी संरक्षणमंत्री शिगेरु इशिबा हे केवळ २५४ मतापर्यंत मजल मारू शकले आहेत.

* या निवडणुकीत बाजी मारल्याबरोबरच शिंजो ऍबे यांना पंप्रधानपदासाठी आणखी तीन वर्षाचा कार्यकाळ उपभोगणारे पंतप्रधान बनण्याचा ऍबेना बहुमान मिळाला आहे.

* यापूर्वी हा विक्रम तारो कत्सुरा यांच्या नावे होता. त्यांनी १९०१ ते १९१३ या दरम्यान तीन वेळा पंतप्रधान भूषविले होते. उल्लेखनीय बाब अशी की चालू आठवड्यात संयुक्त राष्ट्रांची महासभा न्यूयॉर्कमध्ये भरणार आहे.

* तसेच अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोबतच्या शिखर परिषदेला शिंजो ऍबे हजेरी लावणार आहे. न्यूयॉर्कमध्ये दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.