शुक्रवार, २८ सप्टेंबर, २०१८

व्यभिचार गुन्हा ठरविणारे कलम रद्द - २८ सप्टेंबर २०१८

व्यभिचार गुन्हा ठरविणारे कलम रद्द - २८ सप्टेंबर २०१८

* विवाहबाह्य संबंधात सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वपूर्ण निकाल दिला आहे. पुरुष आणि स्त्री दोन्ही समान आहेत. त्यामुळे विवाहबाह्य संबंधात पती हा पत्नीचा मालक होऊ शकत नाही. ''

* असे सांगताच विवाहबाह्य संबंध व्यभिचार हा गुन्हा नाही. हा अपराध होऊ शकत नाही. असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.  व्यभिचाराला गुन्हा ठरविणारे भारतीय दंड संहिता कलम ४९७ ही कोर्टाने रद्द केले.

* व्यभिचार हा गुन्हा नसला तरी विवाहबाह्य संबंधाच्या कारणाने स्त्री किंवा पुरुष दोघांनाही घटस्फोट घेता येऊ शकतो असे मिश्रा यांनी स्पष्ट केले.

* हा कायदा मनमानी करणारा असल्याचे चंद्रचूड यांनी सांगितले. हा कायदा स्त्रियांची मानहानी करणारा आहे. हा कायदा लैंगिक पसंती रोखणारा आहे. त्यामुळेच तो असंवैधानिक आहे.

* लग्नानंतर स्त्रियांना लैंगिक पसंतीपासून रोखता येणार नाही. असेही चंद्रचूड यांनी सांगितले. व्यभिचार हा गुन्हा नसला तरीही विवाहबाह्य संबंधाच्या कारणाने स्त्री किंवा पुरुष दोघांनाही घटस्फोट घेता येऊ शकतो.

* ४९७ कलमाला गुन्हा न ठरविल्यास विवाह संस्थांमध्ये वादळ निर्माण होईल. असा तर्क केंद्र सरकारने दिलेल्या प्रतिज्ञापत्रात वर्तविला होता.

* ऍडल्ट्रीला गुन्ह्याच्या श्रेणीतून बाहेर काढल्यास विवाहाचे पावित्र्य संपुष्टात येईल आणि त्यामुळे समाजात तणाव निर्माण होईल. तसेच विवाह संस्थांमध्ये वादळे येतील. असे केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. ४९७ कलमामुळे विवाह संस्था टिकून आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.