शनिवार, २२ सप्टेंबर, २०१८

आज मोदींच्या हस्ते 'आयुष्यमान भारत' योजनेचा शुभारंभ - २३ सप्टेंबर २०१८

आज मोदींच्या हस्ते 'आयुष्यमान भारत' योजनेचा शुभारंभ - २३ सप्टेंबर २०१८

* केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी आयुष्यमान भारत राष्ट्रीय आरोग्य संरक्षण अभियानाचा एबी-एनएचपीएम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी झारखंड येथून शुभारंभ केला जाणार आहे.

* प्रधानमंत्री जनआरोग्य अभियान पीएमजय या नावाने रूपांतरित करण्यात आलेल्या या योजनेत देशातील १० कोटी गरीब कुटुंबाना वार्षिक पाच लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण मिळणार आहे.

* योजनेसाठी पात्र ठरलेल्या नागरिकांना सरकारने ठरवून दिलेल्या खाजगी रुग्णालयात मोफत उपचार मिळतील. गरीब आणि वंचित कुटुंबासाठी ही योजना आहे.

* ग्रामीण भागात ८.०३ कोटी, तर शहरी भागात २.३३ कोटी कुटुंबाची निवड योजनेचे लाभार्थी म्हणून करण्यात आली आहे. ताज्या सामाजिक आर्थिक जातनिहाय जनगणनेची आकडेवारी यासाठी ग्राह्य धरण्यात आली.

* या योजनेद्वारे ५० कोटी लोकांना मोफत आरोग्य विम्याचे संरक्षण मिळेल. शहरी भागात ११ प्रकारच्या व्यवसायांना योजनेच्या लाभार्त्यांना स्थान देण्यात आले.

* त्यात कचरा वेचणारे, भिकारी, घरकामगार, फेरीवाले, चर्मकार, बांधकाम कामगार, प्लम्बर, गवंडी, मजूर, पेंटर, वेल्डर, सुरक्षा रक्षक, हमाल, स्वच्छता कामगार यांचा त्यात समावेश आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.