मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१८

काही विशेष चालू घडामोडी - ४ सप्टेंबर २०१८

काही विशेष चालू घडामोडी - ४ सप्टेंबर २०१८

* वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचरच्या डब्लूडब्लूएफ अहवालानुसार गंगा ही नदी जगातील सर्वात संकटग्रस्त नद्यांपैकी एक आहे. 

* भारतातील मेडिकल क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार डॉ. बी. रॉय मेडिकल पर्सन ऑफ द ईयर हा पुरस्कार मुंबईचे प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ बसंत कुमार मिश्रा यांना जाहीर झाला आहे. 

* भारतीय अर्थतज्ञ सत्या त्रिपाठी यांची संयुक्त राष्ट्रांचे साहसरचिटणीस व संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमाचे प्रमुख म्ह्णून नियुक्ती करण्यात आली आहे. 

* ईरम हबीब या ३० वर्षीय तरुणीने काश्मीर खोऱ्यातील पहिली मुस्लिम महिला वैमानिक होण्याचा मान पटकाविला आहे. 

* भारतीय हवाई दलाच्या सी-१७ ग्लोबमास्टर या सर्वात मोठ्या मालवाहू विमानाने चेन्नईहुन ऑस्ट्रेलियाला ११ तासांचे विनाथांबा सर्वाधिक लांब पल्ल्याचे उड्डाण केले. 

* केवळ ४ जी सेवा आणि अत्यंत स्वस्त दर यामुळे रिलायन्स जियो ही भारतातील प्रथम क्रमांकाची डेटा सेवादाता कंपनी बनली आहे. 

* नोटबंदीमुळे चलनातून बाद झालेल्या ९९.३० टक्के नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे जमा झाल्याची माहिती आरबीआयच्या २०१७-१८ च्या वार्षिक अहवालातून समोर आली आहे. 

* ज्येष्ठ अभिनेते आणि तेलगू देसम पार्टीचे नेते नंदमुरी हरिकृष्णा यांचे २९ ऑगस्ट रोजी निधन झाले. ते आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री यांचे मेहुणे आणि अभिनेते एन टी राव यांचे पुत्र होते. 

* अमेरिकेचे सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय नाटककार तसेच पटकथा लेखक नील सायमन यांचे २६ ऑगस्ट रोजी निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते. 

* दिल्ली सरकारने आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक एस के अरोरा यांना जागतिक आरोग्य संघटनेच्या मानाच्या तंबाखू विरोधी दिन २०१८ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 

* बिजू जनता दल यांची सत्ता असलेल्या ओडिशा राज्यात विधान परिषद अस्तित्वात आणण्याचा निर्णय तेथील राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. 

* फ्रान्समधील विची येथे पार पडलेल्या आयर्नमॅन २०१८ या स्पर्धेचा किताब ५२ वर्षीय नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ रवींद्रकुमार सिंगल यांनी पटकाविला आहे. 

* भामला फाउंडेशनच्या प्लास्टिकविरोधी मोहिमेची युनोकडून दखल घेण्यात आली आहे. तर प्लॅस्टिक जनजागृती विषयक मोहिमेला संयुक्त राष्ट्र संघटनेतून जागतिक स्तरावर प्लास्टिक जनजागृती विषयक मोहीम म्हणून घोषित करण्यात आले. 

* भारतीय महिला संघाची अनुभूती क्रिकेटपटू झुलन गोस्वामी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. 

* भारतातील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे बाजार भांडवल सुमारे ८ लाख कोटीवर पोहोचले आहे. हा टप्पा ओलांडणारी रिलायन्स ही पहिली कंपनी बनली आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.